अवश्य वाचा


  • Share

प्रत्येक रूग्णालयात ऑडीटर तपासणार आता कोविड रुग्णांचे बिले : जादा बीले आकारणीला बसणार चाप; तहसीलदार अमोल निकम यांच्या आदेशाने संगमनेरकरांना दिलासा

संगमनेर प्रतिनिधी अनेक प्रयत्नानंतरही संगमनेर तालुक्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाला ब्रेक लागला नाही. शासनाच्या "ब्रेक द चैन" मोहीम सुरू असताना सुध्दा तालुक्यात रूग्ण संख्या आटोक्यात येत नाही. त्यामुळे जवळपास सर्वच रुग्णालये कोविड रुग्णांनी ओसंडून वाहत आहेत. त्यातच रुग्णांना बेड, औषधे, आॅक्सीजन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ व ससेहोलपट वाढली आहे. एकीकडे रुग्ण वाचविण्याची धडपड सुरू असताना उपचाराच्या नावाखाली रुग्णालयांकडून अवास्तव बिलांची वसुली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक गरीबांना उपचार करून घेणे जिकरीचे बनले होते. या पार्श्वभूमीवर संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दोन नियंत्रक, दोन पर्यवेक्षक आणि 26 कर्मचार्‍यांचा समावेश असलेल्या ‘भरारी पथका’ची नेमणूक केली आहे. या पथकावर कोविड उपचार करणार्‍या तालुक्यातील 35 रुग्णालयांची जबाबदारी देण्यात आली आहे. सोपविलेल्या कर्तव्यात कसूर केल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतूदीन्वये कारवाई करण्याचाही इशाराही तहसीलदार अमोल निकम यांनी दिला आहे. या निर्णयामळे रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोविड संसर्गाने संपूर्ण जिल्ह्या हादरून गेला आहे. रोज उच्चांकी रुग्णसंख्या समोर येत असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना अतिदक्षता, ऑक्सिजन अथवा व्हेंटीलेटरची आवश्यकता भासल्यास अशा रुग्णांना त्या खाटाच उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक रुग्णालयांचा उंबरठा झिजवावा लागत आहे. अनेक प्रयत्नांनंतर कोणत्यातरी एखाद्या रुग्णालयात ती उपलब्ध होते, मात्र रुग्णाला दाखल करतांना काही रुग्णालये अगोदर पैसे भरा, पाॅलिसी असेल तर ती नंतर पाहू असे सांगून रुग्णांची अडवणूक करतात. तसेच उपचारानंतर शासनाच्या निकषांपेक्षा जास्त बिल आकारता. या पार्श्वभूमीवर रुग्णांना दिलासा मिळणे अत्यंत आवश्यक बनले होते. या सर्व गोष्टींचा विचार करुन संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी संगमनेर तालुक्यातील कोविडवर उपचार करणार्‍या 35 रुग्णालयांसाठी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकांकडून रुग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यापूर्वी त्याच्याकडून आकारण्यात आलेल्या बिलाचे ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय ज्या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्यान्वित आहेत अशा ठिकाणी या योजनेनुसार गरजू रुग्णांवर उपचार होत आहेत की नाही याची तपासणीही अचानक छापा घालून करण्याच्या सूचना या पथकाला देण्यात आल्या आहेत. कोविड उपचार देणार्‍या रुग्णालयांसाठी सामान्य, अतिदक्षता, ऑक्सिजन व व्हेंटीलेटर अशा सुविधांसह कोणत्या श्रेणीतील खाट रुग्णाला देण्यात आली आहे त्यानुसार कोणत्या सुविधेचे अधित्तम किती पैसे आकारावे याबाबत दर निश्चित केली आहे. त्यानुसार तालुक्यातील रुग्णालयांमध्ये कारवाई केली जाते का? रुग्णांना कॅशलेस सुविधा पुरविण्यात आली आहे का? शासकीय योजना कार्यान्वित असलेल्या रुग्णालयामध्ये गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळतोय का? या गोष्टींच्या तपासणीसह तालुक्यातील सर्व 35 कोविड रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांकडून अंतिम देयके (बिल) वसुल करण्यापूर्वी संबंधित पथकाकडून त्याचे ऑडिट होणे अनिवार्य करण्यात आले आहे. दर आठवड्याला याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयासह इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार यांना देण्याचे बंधनही या पथकाला घालण्यात आले आहे. *तयार करण्यात आलेल्या भरारी पथकाचे नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. लेखापाल प्रदीप वर्पे यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकातील सुनील खेमनर (9657142666) यांच्यावर ओम गगनगिरी रुग्णालय, मच्छिंद्र आव्हाड (9822520173) यांच्यावर साईसुमन हॉस्पिटल, राजेंद्र बिल्लाडे (9423161750) यांच्यावर इथापे हॉस्पिटल, धर्मेंद्र खंबैत (7350662876) यांच्यावर साई जनरल हॉस्पिटल, पिंपरणे व गायकवाड हॉस्पिटल, आश्वी बु., बी.टी.पुंड (9022944417) यांच्यावर सुयश हॉस्पिटल, एन.पी.गवारे (9326610109) यांच्यावर चैतन्य हॉस्पिटल, अनिल सौंदणकर (8237841273) मेडिकव्हर हॉस्पिटल (तांबे हॉस्पिटल), आर.यू.वाकचौरे (8421090988) यांच्यावर धन्वंतरी हॉस्पिटल, बी.आर.गजे (9763184012) यांच्यावर पसायदान व सिद्धकला हॉस्पिटल, तृप्ती कराड (9922079516) यांच्यावर गुंजाळवाडीतील दत्तकृपा व माऊली हॉस्पिटल, ए.एस.शेख (9527238935) यांच्यावर साकूर येथील मातोश्री हॉस्पिटल व गुंजाळवाडी पठार येथील वृंदावन हॉस्पिटल, सुनील साळुंखे (9527525794) यांच्यावर सत्यम हॉस्पिटल व घुलेवाडीचे गुरुप्रसाद हॉस्पिटल, अरुण काकडे (820887488) यांच्यावर घारगाव येथील भंडारी हॉस्पिटल, संदीप मेखे (9421516924) व विलास देशमुख (7020187328) यांच्यावर संजीवनी हॉस्पिटल, धनंजय बोरकर (9960532219) यांच्यावर सिद्धी हॉस्पिटलची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.* या पथकाकडून समाधान न झाल्यास पर्यवेक्षक प्रदीप वर्पे (9421334589) यांच्याशी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधता येवू शकणार आहे. दरम्यान *दुसर्‍या भरारी पथकाची नियंत्रक अधिकारी म्हणून जबाबदारी संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांच्यावर सोपविण्यात आली असून उपकोषागार रुपेश भालेराव (7038559999) यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. या पथकात संजय आवारी (7798912855) यांच्यावर आरोटे हॉस्पिटल, सचिन लवलेकर (9881508780) यांच्यावर वाणी आणि शेळके हॉस्पिटल, विशाल परदेशी (9511737890) यांच्यावर साई आणि शेवाळे हॉस्पिटल, वाय.एन.कापसे (7756971386) यांच्यावर कुटे व सेवा हॉस्पिटल, डी.एन.चतुरे (9657626038) यांच्यावर कानवडे हॉस्पिटल, संतोष भोसले (9762646335) यांच्यावर मालपाणी हॉस्पिटल, क.च.कगुणे (9325151626) यांच्यावर रसाळ हॉस्पिटल, देशपांडे (8208874688) यांच्यावर यूनिटी हॉस्पिटल, पवन बहुरे (7218247453) यांच्यावर पाठक हॉस्पिटल, राजेश शुक्ला (7088305286) यांच्यावर शिंदे हॉस्पिटल व ताम्हाणे हॉस्पिटल आणि रामदास गांगुर्डे (9822616221) यांच्यावर निघुते हॉस्पिटलची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.* या भरारी पथकांना वरील रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना मिळत असलेल्या सुविधा, सरकारी योजनांचे लाभ यासह नियमानुसार व ठरवून दिल्याप्रमाणे बीले दिली जात आहेत का याबाबतचे ऑडिट करुनच रुग्णांकडून बील वसुल करण्यास सांगितले आहे. संगमनेर तहसीलदार व इन्सीडेंट कमांडर अमोल निकम यांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून काही रुग्णालयांकडून सुरु असलेली लुट थांबवता येणे शक्य होणार आहे. कोविडवरील उपचार सुरु असतांना रुग्णालयाने कोणतीही सुविधा पुरविली तरीही त्याचे देयक एक लाख रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये असा नियम करण्यात आला होता. मात्र पूर्वी स्थापन्यात आलेल्या भरारी पथकांना याचा विसर पडल्याने संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी नव्याने ऑडिटर व भरारी पथकाची नेमणूक केली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना अवास्तव देयकं असल्याची शंका असल्यास वरीलप्रमाणे ज्या रुग्णालयासाठी अधिकार्‍याची नेमणूक केली गेली आहे त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे. *अगोदरच कोविड 19 आजाराने नागरिक हैराण झाले आहे. त्यात या स़कटाला संधी माणून काहिंनी अक्षरक्षः लुटमार सुरू केली आहे. हजार बाराशेला मिळणारे रेमडेशिव्हिर इंजेक्शन वीस ते पंचवीस हजारांना विकले जात आहे. या वैद्यकीय काळाबाजारामुळे अनेक जण कर्जबाजारी झाले आहे. आतातर कुणी कर्ज पण , अशी अवस्था निर्माण झाली आहे. कारण कोविडचा मृत्यू दर वाढू लागल्याने कर्जाची हमी कोण घेणार अशा बिकट अवस्थेत वैद्यकीय व्यवसायातील हा गोरख धंदा थांबवणे गरजेचे होते. तहसीलदार अमोल निकम यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे निश्चित सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.