अवश्य वाचा


  • Share

तालुक्यातुन कोरोना जाता जाईना आज पुन्हा 62 जणांना बाधा

दि. 30/09/2020 तालुक्यातुन कोरोना जाता जाईना आज पुन्हा 62 जणांना बाधा संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातुन कोरोना माघार घ्यायचे नाव घेत सध्या तरी घेत नाहीये. प्रशासनाकडून घेण्यात येणार्‍या मोठ्या प्रमाणातील चाचण्यांमुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण समोर येत आहेत. त्यात आज पुन्हा 62 जणांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील तेरा जणांचा समावेश आहे तर ग्रामीण भागातील एकोणपन्नास जणांचा समावेश आहे. आज बाधित आढळलेल्यांंमध्ये शहरातील मालदाड रोड परिसरातील 32 वर्षीय तरुण, पावबाकी रोडवरील 48 वर्षीय महिलेसह 27 वर्षीय तरुण, देवाचा मळा परिसरातील 43 व 40 वर्षीय तरुण, साईनगर मधील 45 वर्षीय महिला, शिवाजीनगर परिसरातील 49 वर्षीय महिला, पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातील 45 वर्षीय महिला, अरगडे मळा परिसरातील 41 वर्षीय तरुण, इंदिरानगर परिसरातील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, बस स्थानक परिसरातील तीस वर्षीय तरुण व परदेशपूरा भागातील 28 वर्षीय तरुणासह शहरातील 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यासोबतच आज ग्रामीण भागातील एकोणपन्नास जणांचे अहवालही पॉझिटिव प्राप्त झाले. त्यात घुलेवाडी येथील 59 वर्षीय इसमासह 38, 30 व 25 वर्षीय तरुण, तसेच अकरा वर्षीय बालिका, गुंजाळवाडीतील 62 व 35 वर्षीय महिलेसह 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 34 वर्षीय दोघे तरुण, समनापुर येथील 34 वर्षीय तरुण, निमगाव पागा येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 43 व 38 वर्षीय महिला, तसेच 29, 16 व 15 वर्षीय तरुणी, धांदरफळ खुर्द येथील 25 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द येथील 26 वर्षीय तरुण, घारगाव येथील 18 वर्षीय तरुण, कवठे बुद्रुक मधील 80 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40 वर्षीय तरुण, 55, 35 व 33 वर्षीय महिला, जवळे कडलग येथील 12 वर्षीय बालिका, उंबरी बाळापूर येथील 16 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 45 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 84 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 36 वर्षीय महिला, मालदाड येथील 53 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 44 वर्षीय तरुण व 42 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथील 62 वर्षीय इसम, आंबी खालसा येथील बारा वर्षीय बालक, निमगाव जाळी येथील 51 वर्षीय इसम, निमगाव बुद्रुक येथील 28 वर्षीय तरुण, मांडवे बुद्रुक येथील 25 वर्षीय तरुण, खांजापुर येथील 49 वर्षीय इसमासह 38 व 22 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 79 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, म्हसवंडी येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमोण येथील 55 वर्षीय इसम, हंगेवाडी येथील 58 वर्षीय इसम, कोळवाडे येथील 35 वर्षीय तरुण, निमज येथील 53 वर्षीय इसम व नांदुरी दुमाला येथील 40 वर्षीय तरुण अशा एकूण बासष्ट जणांचे अहवाल पॉझिटिव त्यामुळे तालुक्याची एकूण कोरोना बाधितांची संख्या 3200 पार गेली आहे.