अवश्य वाचा


  • Share

संगमनेर तालुक्याच्या कोविडचा पुन्हा उद्रेक..! ग्रामीण भागात रुग्णसंख्येत मोठी वाढ

संगमनेर तालुक्याच्या कोविडचा पुन्हा उद्रेक..! ग्रामीण भागात रुग्णसंख्येत मोठी वाढ संगमनेर महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोविडने तालुक्याच्या ग्रामीण भागाला जोरदार धक्का देत तब्बल 64 रुग्णांची भर घातल्याने गेली तीस दिवस ओहोटी लागलेल्या तालुक्याला आज रुग्णसंख्येची भरती अनुभवावी लागली. आज एकाच दिवसाच्या रुग्णवाढीने तालुक्याची सरासरी उंचावत 33.65 वर पोहोचवली आहे. आजच्या रुग्णवाढीने रुग्णसंख्या 4 हजार 290 वर पोहोचली आहे. शहरातून मात्र समाधानकारक चित्र असून ग्रामीण भागातील रुग्णगतीत वाढ झाली असली तरीही, शहरी रुग्णगती मात्र आणखी मागे सरली आहे. आजच्या एकूण रुग्णसंख्येत शहरातील अवघ्या चौघांचा समावेश आहे. आॅक्टोबर महिन्यात संगमनेर तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत 1 हजार 43 रुग्णांची भर पडली. त्यातील 191 रुग्ण शहरी तर 852 रुग्ण ग्रामीणभागातील आहेत. दररोज समोर येणार्‍या रुग्णसंख्येत शहरी रुग्ण समोर येण्याचे प्रमाण 19.10 टक्के तर ग्रामीण रुग्ण समोर येण्याचे प्रमाण 80.90 टक्के आहे. या महिन्यात रॅपिड अँटीजेन चाचणीतून 715, शासकीय प्रयोगशाळेतून 14 तर खासगी प्रयोगशाळेतून 314 रुग्ण निष्पन्न झाले आहेत. आज रॅपिड अँटीजेन चाचणीतून तब्बल 54 रुग्ण तर खासगी प्रयोगशाळेकडून दहा रुग्ण समोर आले आहेत. आजच्या एकूण रुग्णसंख्येत संगमनेर शहरातील अवघ्या चार रुग्णांचा समावेश आहे. त्यात जनता नगर परिसरातील 51 वर्षीय इसम, अभंगमळा परिसरातील 41 वर्षीय तरुण, गुजर गल्लीतील 40 वर्षीय तरुण व मालदाड रोड येथील 33 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. यासोबतच शहरालगतच्या घुलेवाडी शिवारातील साईश्रद्धा चौकातील 53 वर्षीय महिलेलाही संक्रमण झाले आहे. ग्रामीण भागातील निमगाव टेंभी, कुरकुंडी, ओझर बुद्रुक, राजापूर, आश्वी बुद्रुक आणि घुलेवाडी येथे बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी नियमांचे पालन करीत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. आज ग्रामीण भागातील 60 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात हंगेवाडी येथील 52 वर्षीय इसमासह 47 वर्षीय महिला, ओझर बुद्रुक येथील 55 वर्षीय इसमासह 28 वर्षीय तरुण, 50 व 27 वर्षीय महिला, पिंपरणे येथील 35 वर्षीय महिलेसह 24 वर्षीय तरुण, कनोली येथील 70 वर्षीय इसमासह 65 वर्षीय महिला, रायतेवाडी येथील 50 वर्षीय महिलेसह 32 वर्षीय तरुण, खांडगाव येथील 60, 40 व 23 वर्षीय महिला आणि 18 वर्षीय तरुण, वरुडी पठार येथील 20 वर्षीय महिला, निमगाव टेंभी येथील 50, वर्षीय इसमासह 22 वर्षीय दोघे तरुण, 55, 45 व 18 वर्षीय महिला, घारगाव येथील 45 वर्षीय तरुण, कुरकुंडी येथील 29 वर्षीय तरुणासह पाच वर्षीय बालक, 60 व 25 वर्षीय महिलेसह आठ आणि चार वर्षीय मुली, राजापूर येथील 44 वर्षीय तरुणासह 40 व 29 वर्षीय महिला, 17 व 15 वर्षीय तरुणी, जोर्वे येथील 42 वर्षीय तरुणासह 40 वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक येथील 58, 43 व 29 वर्षीय इसमासह 55 व 30 वर्षीय महिला, तसेच 9, 7 व एक वर्षीय बालिका, अंभोरे येथील 43 वर्षीय तरुण, ढोलेवाडी येथील 46 वर्षीय इसम, घुलेवाडी येथील 42 वर्षीय दोघा तरुणांसह 40 वर्षीय महिला व सात वर्षीय बाालिका, वरवंडी येथील 31 वर्षीय महिला, सारोळे पठार येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चनेगाव येथील 50 वर्षीय इसम, मेंढवण येथील एकूण 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मंगळापुर येथील 42 वर्षीय तरुण, साकुर येथील 55 वर्षीय महिला व गुंजाळवाडी येथील 30 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव प्राप्त झाला आहे. आज शहरातील चौघांसह ग्रामीण भागातील 60 जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाल्याने तालुक्याची रुग्णसंख्या 43 व्या शतकाच्या उंबरठ्यावर 4 हजार 290 वर पोहोचली आहे.